Logo

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
Agriculture Programs Admission Process 2020-2021

IMPORTANT



                                                         *विद्यार्थ्यांसाठी आणि कृषी शिक्षणकेंद्रांसाठी महत्त्वाच्या सूचना*

• कोविड -१९ च्या परिस्थितीच्या अनुषंगाने, कृषी विज्ञान पदवी आणि उद्यानविद्या पदवी प्रवेश परीक्षा घ्यावयाची नाही असे विद्यापीठ स्तरावर ठरविण्यात आलेले आहे. प्रवेश अर्ज भरण्याची मुदत २७ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०२० या कालवधीसाठी राहील. विद्यापीठाने संपूर्ण प्रवेशप्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनेच घेण्याचे निश्चित केलेले आहे.
• कृषी शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यापूर्वी डावीकडील बाजूस असलेल्या कृषी शिक्षणक्रम माहितीपुस्तिका 2020-21 (Prospectus), वेळापत्रक (Schedule), प्रवेश अर्ज भरण्याबाबतचे Presentation याचा अभ्यास करूनच त्यानंतरच Online प्रवेश अर्ज भरावा.
• सदरील ऑनलाइन फॉर्म भरते वेळी विद्यार्थ्याकडे पासपोर्ट साइज फोटोकॉपी, स्वतःची स्वाक्षरी असलेली फोटोकॉपी, तसेच आरक्षणाचा लाभ घेणार असल्यास त्यासंबंधीचे आरक्षण वर्गातील विविध दाखले/ प्रमाणपत्रे (सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्रे) इत्यादी बाबींचे अधिकृत मूळ दाखले/ प्रमाणपत्रे यांच्या पूर्णतः सुस्पष्टपणे स्कॅन केलेल्या सॉफ्ट फोटोकॉपी स्वतःकडे ऑनलाईन प्रवेश अर्ज संबंधित ठिकाणी अपलोड करण्यासाठी तयार ठेवाव्यात.
• विद्यार्थी सदरील ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वतः त्याला उपलब्ध असलेल्या संगणकावर भरू शकेल, तथापि यासाठी अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित कृषी शिक्षणकेंद्राची ची मदत घ्यावी.
• विद्यापीठाने विहित केलेल्या कालावधीमध्येच संपूर्णतः अचूकपणे भरलेला, सत्यता असलेला, तसेच सर्व अपलोड केलेले कागदपत्रे सुस्पष्ट दिसतील असे स्कॅन केलेले असलेले प्रवेश अर्जच पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल याची कृपया सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
• ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी ह्या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेद्वारांनी युजर आईडी व पासवर्ड मिळविण्यासाठी वर दिलेल्या “Apply Online for Candidates” बटनवर क्लिक करून नोंदणी करा.
• ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल. कृपया आपला लॉगीन आयडी आणि पासवर्ड भविष्यातील दळणवळणा साठी जतन करून ठेवा. कृपया आपला लॉगीन आयडी आणि पासवर्ड गुप्त ठेवा.
• उजवीकडील बाजूस असलेल्या युझर आयडी आणि पासवर्ड रकान्यात तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरून आपण ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकता.
• कृषी विज्ञान पदवी आणि उद्यानविद्या पदवी या शिक्षणक्रमाच्या पात्रतेसाठी प्रवेश परीक्षेऐवजी पदवी शिक्षणक्रमाच्या पात्रतेसाठी आवश्यक असलेल्या संबंधित विद्यार्थ्याने पूर्ण केलेल्या तीन पदविका (Diploma) शिक्षणक्रमांच्या टक्केवारीची सरासरी गुणवत्ता यादी ग्राह्य धरण्यात येईल.
• कृषी विज्ञान पदवी (T19) या शिक्षणक्रमासाठी उद्यानविद्या पदविका (T20), कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका (T14), कृषी पत्रकारिता पदविका (T18) या तीन पदविका उत्तीर्ण असणे विद्यार्थ्यास आवश्यक राहील.
• उद्यानविद्या पदवी (T18) या शिक्षणक्रमासाठी फळबागा उत्पादन पदविका (T15), भाजीपाला उत्पादन पदविका (T16) , फुलशेती व प्रमाणविज्ञान पदविका (T17) या तीन पदविका उत्तीर्ण असणे विद्यार्थ्यास आवश्यक राहील.
• सदर प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्याकडून प्रवेश प्रक्रिया शुल्क रुपये ५००/-इतके असेल.
• कृषी विज्ञान पदवी आणि उद्यानविद्या पदवी यांच्या प्रवेशफेरी विषयीच्या महत्त्वाच्या तारखा प्रवेश अर्ज भरल्यानंतर वेब पोर्टल वर उपलब्ध केल्या जातील.
LOGIN
 
 
News & Notifications
Download Sample Forms